हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता प्रत्येक बँका व्याजदर वाढवत आहेत. ICICI आणि बँक ऑफ बडोदा नंतर, आता HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्ज महाग केले आहे. HDFC ने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 30 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. हे नवे दर 9 मे पासून लागू होतील.
त्यानुसार, 750 क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी, जे व्याज आतापर्यंत 6.70 टक्के होते, त्यांचा EMI आता 7.00 टक्के मोजला जाईल. दुसरीकडे, महिलांना आता 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.75 टक्क्यांऐवजी 7.05 टक्के ईएमआय भरावा लागेल. याआधी ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी रेपो रेटशी संबंधित कर्जाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. ICICI बँकेने हा दर 8.10 टक्के केला आहे, तर बँक ऑफ बडोदाने 6.90 टक्के केला आहे.
बुधवारी रेपो दरात वाढ करण्यात आली
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी रेपो रेट मध्ये 40 बेसिस पॉइंट्स (bps) वाढीची घोषणा केली. यासोबतच कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्येही ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे व्याजदरांवर दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत, बँकांनी आरबीआयच्या ताज्या घोषणेनुसार त्यांच्या रेपो दराशी संबंधित गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.