हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी खाजगी बँकपैकी असलेल्या HDFC बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.35 टक्क्यांची वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या नवीन आणि सध्याच्या ग्राहकांसाठीचे कर्ज महागणार आहेत. या वाढीनंतर होम, ऑटो आणि पर्सनल यासह सर्व प्रकारची कर्जे आणखी महाग होतील.
आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात 7 मे रोजी देखील बँकेकडून MCLR मध्ये 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. याशिवाय, 1 जून रोजी देखील बँकेकडून रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये 5 बेस पॉईंटने वाढ केली गेली होती.
बँकेचे नवीन व्याजदर कसे असतील ???
MCLR मध्ये 0.35 टक्के वाढ झाल्यानंतर एका महिन्यासाठीच्या कर्जाचा व्याजदर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे 3 महिन्यांसाठी 7.25 टक्क्यांवरून 7.60 टक्के, 6 महिन्यांसाठी 7.35 टक्क्यांवरून 7.70 टक्के, एका वर्षासाठी 7.50 टक्क्यांवरून 7.85 टक्के, दोन वर्षांसाठी 7.60 टक्क्यांवरून 7.95 टक्के आणि 3 वर्षांसाठी कर्जाचा दर 7.70 वरून टक्क्यांवरून 8.05 टक्के वाढला आहे.
RBI रेपो दर
गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात RBI कडून रेपो दरात अचानक वाढ करण्यात आली होती. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांनी आपल्या व्याजदरात बदल केले आहेत. 6 जून ते 8 जूनपर्यंत RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू आहे. असे म्हंटले जात आहे की RBI पुन्हा एकदा दर वाढ करू शकते. जर असे झाले तर बँका पुन्हा व्याज दरात वाढ करतील. HDFC
MCLR म्हणजे काय ???
MCLR हा किमान व्याजदर आहे जो वित्तीय संस्था कोणत्याही कर्जासाठी आकारते. हे कर्जाच्या व्याजदराचा खालचा भाग ठरवते. इथे हे लक्षात घ्या कि, MCLR मधील हा बदल RBI च्या रेपो दरावर अवलंबून असतो. ग्राहकांनी मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जर आधीच कर्ज घेतले असेल, तर कर्जाची रिसेट तारीख आल्यावर तुमच्या कर्जावर नवीन दर लागू होतील. HDFC
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा
आपले हरवलेले SBI Card घरबसल्या कसे ब्लॉक करावे हे जाणून घ्या
रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर