कार्यालयात घुसून व्यावसायिकाला मारहाण करीत दिवसाढवळ्या तब्बल 13 तोळे सोने लंपास

औरंगाबाद – जमीन खरेदी- विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या 66 वर्षीय वृद्धाच्या कार्यालयात जाऊन दोन अज्ञात आरोपीनी बेदम मारहाण करीत तब्बल 13 तोळे वजनाच्या गळ्यातील तीन सोन्याच्या चेन ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी वरद गणेश मंदिरा मागे घडली. या घटनेमुळे परिसरातील व्यवसाईकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोक शनकारराव पाटील असे लूट झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पाटील यांचे बसस्थानक समोरील भागात जमीन खरेदी-विक्रीचा व्यावसायिक कार्यालय आहे.याच ठिकाणी ते सर्व व्यवहार करतात. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाटील कार्यालयात एकटे असताना अंदाजे 25 वयोगटातील दोन आरोपी त्यांच्या कार्यालयात आले व काही समजण्याच्या आतच दोन्ही आरोपीनी पाटील यांना मारहाण करीत गळ्यातील चार सोन्याच्या साखळ्या ओरबाडल्या त्याचार सोनसाखळी मधील अर्धी साखळी खाली पडली. मात्र 13 तोळे वजनाची सोनसाखळी घेऊन दोनही आरोपींनी वरद गणेश मंदिरामगिल रस्त्याने पोबारा केला.

दोन्ही चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यत आला. मात्र दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात मारहाण करून लुटीची घटना घडल्याने परिसरातील व्यावसायिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.