Health Tips : ‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका; अन्यथा, आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Health Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Tips) आपल्या आहारात भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांसह फळांचादेखील समावेश असायला हवा. त्यात मोसमी फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे कधीही आपल्या आहारात फळांचा समावेश करताना मोसमी फळे जरूर खावीत. बऱ्याच लोकांना नियमित फळे खाण्याची सवय असते. त्यामुळे बरेच लोक एकाच वेळी बरीच फळे आणून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने ती लवकर खराब होत नाहीत, हे कितीही खरं असलं तरी काही फळे मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

काही फळे अशी असतात जी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्यदायी नव्हे तर आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. फळांमधली पोषकता कमी होते आणि ही फळे खाण्यालायक राहत नाहीत. (Health Tips) तुम्हालाही फळे फ्रिजमध्ये साठवण्याची सवय असेल तर ही माहिती पूर्ण वाचा. कारण, आम्ही तुम्हाला कोणती फळे फ्रिजमध्ये साठवू नये याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

1. आंबा

उन्हाळ्याच्या हंगामात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे आंबा. हे फळ सगळ्यांचेच आवडते असल्याने एकदाच मोठ्या प्रमाणात आणले जाते. पण लक्षात घ्या, आंबा कधीही फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. (Health Tips) असे केल्याने आंबा पिकण्याची प्रक्रिया मंदावते. शिवाय वरून साल ताजी आणि आंबा आतून किडत जातो. तसेच त्याची चव आणि पोतदेखील बिघडतो. असा आंबा खाल्ल्याने पोटाच्या समस्या होऊ शकतात.

2. पपई

बऱ्याच लोकांना पपई खायला खूप आवडतो. त्यामुळे पपईचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये साठवले जातात. (Health Tips) तर काही लोक एकाच वेळी जादा पपई आणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण यामुळे पपईची चव आणि पोत बदलतो. तसेच फ्रिजचे तापमान कमी असल्याने पपईची पिकण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे पपई लवकर शिजत नाही आणि पिकलेला पपई खाण्यायोग्य राहत नाही.

3. केळी

बऱ्याच आरोग्यदायी फायद्यांसाठी केळी खाल्ली जातात. पण केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे एकतर त्याचे साल काळे पडते आणि केळ्याच्या गरावर वाईट परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांना अशी केळी खायला देऊ नये. आणखी एक सांगायचं म्हणजे, केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ती लवकर शिजत नाहीत. त्यामुळे केळी कायम खोलीच्या तापमानावर संग्रहित करावी.

4. टरबूज (Health Tips)

उन्हाळ्यात टरबूज हे फळ हमखास खाल्ले जाणारे फळ आहे. अनेक लोकांना टरबूज कापून किंवा असंच फ्रिजमध्ये साठवण्याची सवय असते. पण यामुळे टरबूजातील अँटिऑक्सिडंट्स कमी होतात आणि त्यातील पोषक घटक निघून जातात. ज्यामुळे हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर उरत नाही.

5. संत्री

संत्री हे फळंसुद्धा कधीच फ्रिजमध्ये साठवू नका. यामुळे हे लिंबूवर्गीय फळ आतून कोरडे पडत जाते. ज्यामुळे त्याची चव कमी होते आणि ते खायला खूप कोरडे लागते. शिवाय यातील पोषक घटक देखील कमी होतात. (Health Tips)

6. अननस

जर तुम्ही अननस फ्रिजमध्ये साठवत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. कारण, यामुळे अननसाचा पोत खराब होतो आणि चवही बिघडते. त्यामुळे अननस खोलीच्या तापमानावर ठेवा. अननस पूर्ण पिकला असेल तर एखाद्या दिवसासाठी फ्रिजमध्ये ठेवता येईल. पण अधिक काळ फ्रिजमध्ये राहिल्यास तो खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

7. एवोकॅडो

एवोकॅडो हे फळ कधी फ्रीजमध्ये साठवू नका. यामुळे ते कडक होते आणि व्यवस्थित पिकात नाही. असे योग्यरित्या न पिकलेले एवोकॅडो खाल्ल्याने आरोग्यास फायदे नाही पण तोटे नक्कीच होऊ शकतात.

8. लिची

उन्हाळ्यात खाल्ली जाणारी लिची मोठ्या प्रमाणात आणून फ्रिजमध्ये साठवली जाते. (Health Tips) ज्यामुळे ती फ्रेश राहील असा सर्वसामान्य समज आहे. पण लिची जितकी जास्त काळ फ्रिजमध्ये राहील तितकी लवकर खराब होते. वरवर चांगली दिसत असली तरी आतून पूर्ण खराब झालेली असू शकते. त्यामुळे लिची फ्रिजऐवजी पाण्यात साठवा. यामुळे ती बराच काळ खाण्यायोग्य राहील.