जुनाट कफ आणि पोटाच्या तक्रारींवर घ्या ‘काढा’ …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । जुनाट कफ ज्यांना आहे अशांना श्वसनाचा त्रास होत असतो . अगदी किरकोळ कारणाने जर तुम्हाला सर्दी – पडसे होत असेन तर या घरातील मसाल्यांनि बनवलेला काढा तुम्हाला नक्की आराम देईल . तसेच थकवा आणि अतिकामाने येणारी कणकण देखील हा काढा दूर करतो . पोटाच्या तक्रारी जर पित्त , बद्धकोष्टता यावर देखील अराम मिळतो . अशा बहुगुणी काढ्याला बनवण्यासाठी घरातीलच मसाले आपल्याला लागणार आहेत . चला तर मग पाहुयात हा काढा बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे .

साहित्य : हळद , सुंठ (आल्याचा तुकडा देखील चालेल) , जिरे , मीठ , लवंग २ , दालचिनीचा लहान तुकडा , वेलची १ , बडीशोप , पाणी .

कृती : ३ कप पाणी उकळायला ठेवा .मंद आचेवर गॅस ठेऊन पाण्यात जिरे , बडीशोप , २ लवंग , दालचिनी , वेलची घालून पाणी २ कप होईल असे अंदाजे चांगले उकळू द्या . त्यानंतर त्यात हळद , सुंठ आणि चवीनुसार मीठ घालून २ मिनिटे चांगले उकळा . अंदाजे हा काढा बनण्यासाठी ७ मिनिटे लागतात . काढा झाल्यानंतर गाळून हा काढा घास शिकला जाईल असा सावकाश गरम-गरम घ्या . यातील बहुगुणी मसाले अनेक विकारांवर चांगला परिणाम देतात. हा काढा अगदी रोज सकाळी घेतला तरीही अराम मिळेल . किंवा आपल्या फॅमिली डॉकटरच्या सल्याने देखील घेऊ शकतात .

 

Leave a Comment