Healthy Breakfast : हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नाश्त्यात ‘हे’ पदार्थ खा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Healthy Breakfast) अनेक लोकांना सकाळच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ मिळत नाही. उपाशीपोटी बाहेर पडल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे माहित नसल्यामुळे सर्रास अशा चुका केल्या जातात. सकाळचा नाश्ता आपल्याला पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी मदत करतो आणि त्यामुळे सकाळी नाश्ता हा केलाच पाहिजे. आजकाल चुकीची जीवनशैली आरोग्यावर इतके गंभीर परिणाम करतेय की, कधी कोणता आजार आपल्याला होईल? हे काही सांगता येत नाही.

दरम्यान, हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असताना प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपलं हार्ट सुरक्षित आणि ठणठणीत असेल तर जगण्याची मजा काही औरच आहे. (Healthy Breakfast) म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाश्त्याचे काही असे पदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका टळू शकतो. होय. तुम्ही बरोबर वाचताय. काही पदार्थ असे आहेत जे तुमच्या हार्टचे आरोग्य व्यवस्थित राखण्यास मदत करतात. चला तर या पदार्थांविषयी जाणून घेऊया.

बदाम दूध (Healthy Breakfast)

बदाम हे एकंदरच शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात बदाम दूध घेणं फायद्याचे ठरते. कारण यामध्ये चांगल्या प्रमाणात हेल्दी फॅट्स, फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई असतात. हे गुणधर्म एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात आणि हृदयरोग टाळण्यास मदत होते.

ओट्स

जर तुम्ही दररोज नाश्त्यामध्ये ओट्स खात असाल तर तुमच्या हृदयाचे कार्य सुव्यवस्थित राखण्यास मदत होते. कारण ओट्स हे एकूणच तुमच्या हृदयासाठी आणि पूर्ण आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. (Healthy Breakfast) ओट्समध्ये भरपुर फायबर असते आणि ते पाचन तंत्रात उपस्थित असलेल्या एलडीएल कोलेस्टेरॉलमध्ये मिसळते. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून सहज निघून जातात. त्यामुळे नाश्त्यात ओट्स खाणे फायद्याचे आहे.

योगर्ट विथ फ्रुट्स

दही आरोग्यासाठी चांगले असते. त्यात सकाळच्या नाश्त्यात जर फळांसोबत दह्याचे सेवन केले तर अधिक फायद्याचे ठरते. मात्र यासाठी लो फॅट दह्याचा वापर करावा. हा नाश्ता प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्रोत आहे. (Healthy Breakfast) जो तुमचे पचन सुधारतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखणे फायद्याचे ठरते.

होल ग्रेन सँडविच

जर तुमच्या सकाळच्या नाश्त्यात होल ग्रेन सँडविच असेल तर तुमच्या शरीराला हाय फायबर, लो कॅलरी आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक मिळतील. त्यामुळे वजन नियंत्रणात राहील. शिवाय हा नाश्ता अत्यंत उत्तम असल्यामूळे तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. (Healthy Breakfast)