औरंगाबाद | भावकितील तीन तरुण एकाच दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. अपघातात दोघे दगावले मात्र तिसरा भाऊ गंभीर जखमी होता. उपचार सुरू असतानाच तो बाप बनला. मात्र काही तासातच जखमींचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ मुलगाही दगावला. एकाच दिवसात एकाच परिवारातील चार जणांचा मृत्यू झाल्याने शिल्लेगावात एकच शोककळा पसरली होती. या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश बाळू जाधव, नितीन अंबादास जाधव, गणेश तुकाराम जाधव असे मृत तरुणांची नावे आहेत.या दुर्दैवी घटने प्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तिघेही तरुण एकाच परिवारातील असून चुलत भाऊ होते. गुरुवारी मध्यरात्री औरंगाबादहून येत असताना मुंबई महामार्गावर दुचाकींचा अपघात झाला.या अपघातात त्यात दोघे जागेवरच ठार झाले होते तर गणेश तुकाराम जाधव हा गंभीरपणे जखमी झाला होता. त्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गणेश वर रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी गणेशला पुत्र झाला.मात्र तो शुद्धीवर नसल्याने त्याला ही गोड बातमी देखील परिवाराला देता आले नाही.
एकीकडे कुटुंबातील दोन कर्ते तरुणांचा मृत्यू झालेला.तर तिसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.अशा परिस्थितीत त्याच परिवारातील जखमीला पुत्ररत्न प्राप्त झाले होते. एककीकडे अफाट दुःख तर दुसरी कडे काहीअंशी आशादायी अशी कठीण परिस्थिती जाधव कुटुंबावर होती.जखमी गणेश बरा होईल अशी सर्वानाच अपेक्षा होती. मात्र दुपारचे बारा वाजता-वाजता उपचार घेत असलेला जखमी गणेश देखील दगावला. अगोदरच घरात दोन तरुणाचे मृतदेह परिवाराला हादरवून सोडणारे सोडणारे असतानाच तिसरी तरुणांचा मृत्यूची बातमी समजताच परिवारावर दुःखच डोंगर कोसळला. पित्याचा मृत्यूच्या काही वेळा नंतर तो चिमुकलाही दगावला. एकानंतर एक अशी अनेक दुःखाची डोंगरे जाधव परिवारावर कोसळली.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त होत होती.
गावात एकही घरात पेटली नाही चूल
एका पाठोपाठ गावातील एकाच परिवारातील चार जणांचा एकाच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी तिघांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ जाधव परिवारावर आली.अशी घटना गावकऱ्यांनी न ऐकली होती न पहिली होती. सर्वांसोबत मनमिळाऊ स्वभावाचे तीन भाऊंचे निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.शुक्रवारी नागपंचमी असताना देखील सण साजरा न करता गावात एकही चूल पेटली नाही.