Heatwave And Heart Attack Connection | उन्हाचा कडाका हृदयासाठी धोकादायक; उष्णतेमुळे हार्ट अटॅक कसा येतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. या उन्हामुळे नागरिकांची अवस्था देखील बिकट झालेली दिसत आहे. तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच आता भारतीय हवामान विभागाने देखील एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. या उष्णतेमुळे अनेक लोक आजारांना देखील बळी पडत आहे. अति उष्णतेचा आणि उन्हाचा परिणाम केवळ आपल्या शरीरावरच नाही, तर आपल्या हृदयावर देखील होतो. असे हृदयविकार (Heatwave And Heart Attack Connection) तज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हाला तुमची नेहमीपेक्षा जास्त काळजी घेणे खूप गरजेची आहे. अन्यथा तुम्हाला हृदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो.

उष्णतेची लाट आणि हृदयाचा संबंध काय? | Heatwave And Heart Attack Connection

उष्णतेची लाटणी हृदयाचा यांच्यातील (Heatwave And Heart Attack Connection) संबंध सांगताना डॉक्टर म्हणाले की, उष्णतेची लाट उच्च तापमानामुळे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनी संबंधी प्रणालीवर अतिरिक्त दबाव टाकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. वातावरणातील उच्च तापमान आणि शरीरातील तापमान या सगळ्यांचे नियोजन करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते आणि उष्णता कमी करण्यासाठी तुमच्या त्वचेतील रक्त प्रवाह देखील वाढत असतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त आहे.

कोणत्या लोकांना जास्त धोका?

या उष्णतेच्या लाटेचा वृद्ध लोकांच्या हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळे त्या लोकांना आधीच कोणताही आजार असेल किंवा हृदयाच्या समस्येने जर लोक ग्रस्त आहेत. त्या लोकांच्या हृदयावर अतिरिक्त दाब येतो. आणि त्यांना हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच सामान्य लोक यांमध्ये हायड्रेशन तसेच रक्त घट्ट होणे रक्ताभिसरण यासाठी अधिक परिश्रम करावे लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या हृदयाची काळजी | Heatwave And Heart Attack Connection

  • उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी जास्तीत जास्त हायड्रेटेड राहावे. थंड वातावरणात राहावे त्यामुळे उष्णतेमध्ये जास्त काम करणे टाळावे.
  • उष्णतेच्या काळात सकाळी आणि संध्याकाळी वातावरण थंड असते. या वातावरणात शारीरिक व्यायाम करावा. दिवसभरात बाहेर जाणे टाळावे.
  • निरोगी हृदयासाठी आपल्या आहारात पोषक समृद्ध फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने इत्यादींचा समावेश करा.
  • भरपूर पाणी आणि द्रव्य पदार्थ पिण्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहता. त्यामुळे रक्ताभिसरण देखील चांगले होते आणि उन्हाळ्यात तुमचे हृदय निरोगी राहते
  • सूर्यापासून तुमचे स्वतःचे रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे टोपी घालणे आणि सुती कपडे घालणे गरजेचे आहे.