फलटण परिसरास वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाका; पेट्रोल पंपाचे छत कोसळले

_Phaltan petrol pump collapsed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसापासून कडाक्याचे उन्ह व उकाडा निर्माण होत असल्याने त्यापासून काहीशी सुटका शुक्रवारी फलटणकरांना मिळाली. परतून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. कारण काल शुक्रवारी फलटण शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. तर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तर काही ठिकाणी वृक्ष कोसळून पडली.

गेल्या महिनाभरापासून कडक उन्हामुळे फलटण तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते. मात्र, शुक्रवारी दुपारीनंतर अचानक ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. बघता बघता पावसाने अचानक हजेरी लावली. एकदम बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच ताराबंळ उडाली. फलटण येथे पावसाने चांगलाच तडाका दिल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर शहरातील रिंग रोड पाणी खाली गेला. यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करत वाहने चालवावी लागली.

या वादळी वाऱ्यामुळे फलटण येथील झाडे उन्मळून पडली होती. तहसील कार्यालयाच्या आवारातील मोठे झाड पडल्याने काहीकाळ रस्ता बंद झाला होता. तर झिरपवाडी गावाच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाचे छत कोसळून पेट्रोल पंपावर पडल्याने पंपाचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहरासह परिसरातील गावातील विद्युत पुरवठा काहीवेळेपर्यंत खंडित झाला होता.