Accident News: बस आणि ट्रकची जोरदार धडक; भीषण अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू

Accident News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी पहाटे मेक्सिकोच्या वायव्य सिनालोआ राज्यात प्रवाशांनी भरलेली बस एका भरधाव ट्रकला धडकल्याने भीषण अपघात (Accident News) घडला आहे. या अपघातामध्ये बसमधील तब्बल 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर बसने पेट घेतला…(Accident News)

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 30 ते 35 प्रवासी होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही बस उत्तर-पश्चिम सिनालोआ भागाकडे निघाली होती. त्याचवेळी समोरून भरधाव ट्रॅक आला आणि या ट्रकने बसला जोरात धडक दिली. हा अपघात (Accident News) इतका भीषण होता की, दोन्ही वाहने जागीच चक्काचूर झाली. महत्त्वाचे म्हणजे, या अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. त्यामुळे काही प्रवाशांचा बसमध्ये तडफडून मृत्यू झाला.

अपघाताचे फोटो व्हायरल..

सिनालोआ राज्यात घडलेल्या या अपघातात( Accident News) एकूण 19 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताची माहिती मिळतात स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. सांगितले जात आहे की, जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिला पोलिसांकडून पुन्हा सुरळीत करण्यात आले. सध्या सोशल मीडियावरून या अपघाताचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये आपल्याला अपघाताची भीषणता दिसून येते.