हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यास सोमवारी शहर व परिसरात विजांचा गडगडाट जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे पावसाने सुरुवात केल्यामुळे शिवाय आठवडी बाजार असल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाला. या पावसामध्ये शेतीपिकांसह शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले.
पाटण शहरास सोमावारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी शहरात आलेल्या परिसरातील ग्रामस्थांना आजूबाजूच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागला. शहरात सोमवारी झालेल्या पावसामुळे गटारी भरून रस्त्यावर पाणी आले. आठवडी बाजार असल्याने शिवाय मुसळधार पाऊस कोसल्यामुळे व्यापारी, दुकानदार यांच्या मालाचे भिजून मोठे नुकसान झाले.
सध्या उन्हाळी भुईमूग काढण्याची सर्वत्र लागभग असताना पावसामुळे त्यात व्यत्यय आला असून यावर्षी तालुक्यात आंबा उत्पादन घटल्याने अजून बाजारात आंबा दाखल झाला नाही, त्यातच अवकाळी पावसामुळे जो काही थोड्या फार प्रमाणात आंबा झाडाला आला आहे तोही पडून नुकसान झाले आहे. सोमवारी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीट उत्पादक यांचेही मोठे नुकसान झाले आहे.