नांदेड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने (heavy rain) रौद्ररुप धारण केले आहे. यामध्ये नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये तर गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस (heavy rain) झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड हे आपल्या शेतीकडे जात असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यात वृध्द शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
नेमके काय घडले?
शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते.परंतु ते दुपार पर्यंत घरी परतले नसल्यामुळे घरच्या मुलांनी शेताकडे जाऊन शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यानंतर गावालगत असलेल्या रस्त्यावरील नाल्यात हातातील काठी आढळून आली .यावरून शोध घेतला असता त्याच नाल्यात मृतदेह आढळून आला. यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. कारला येथील वृध्द शेतकऱ्याचा पहिल्याच मुसळधार पावसामुळे (heavy rain) मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ?
आता पाऊस प्रमाणात असता तर कदाचित याचा फायदा या पिकांना झाला असता. मात्र, ढगफुटीसदृश्य पाऊस (heavy rain) झाल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि बियाणेही पाण्यात गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती पण काही मंडळात पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे (heavy rain) पेरलेल्या आणि उगवण झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
अजित पवारांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!
इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!