यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे दोघेजण झाडावर अडकले

0
95
heavy rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. यामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती (heavy rain) निर्माण झाली आहे. यामध्येच आता यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर (heavy rain) आला आहे. यामुळे याठिकाणी नदी पात्रात एका झाडावर दोन जण अडकून पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, हे दोन जण अडकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस (heavy rain) कोसळत आहे. यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. त्यात शेतामध्ये काम करण्यासाठी दोघे गेले होते. मात्र, अचानक बेंबळा नदीची पाणी (heavy rain) पातळी वाढल्याने या दोघांनीही जीव वाचविण्यासाठी एका झाडाचा सहारा घेतला. हि गोष्ट काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

राज्यातील पावसाची (heavy rain) परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या 3 दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here