व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : हॅलो महाराष्ट्र – हकालपट्टीच्या वृत्तानंतर कमालीचे दुखवालेले शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावत शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु दोन तासांतच नजरचुकीने बातमी छापली सांगत ‘सामना’ने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेत त्यांची समजून काढली होती. त्यानंतर आढळरावांनी (shivajirao adhalrao patil) ‘मातोश्री’वर जाऊन आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले होते. मात्र आज शिंदे गटाच्या बैठकीला आढळराव (shivajirao adhalrao patil)  उपस्थित राहिल्याने त्यांनी शिवसेना सोडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्याकरणी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

हकालपट्टीनंतर आढळराव काय म्हणाले ?
काही दिवसांपूर्वी सामनामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil)  यांची हकालपट्टी झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली करत त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. मात्र, त्या वृत्तामुळे माझी बदनामी झाली. माझी शिवसेनेत काय किंमत आहे, हे मला आता समजलं आहे. आतमधून मी अस्वस्थ आहे. येत्या काही दिवसांतच पुढच्या निर्णयाबाबत विचार केला जाईल असे विधान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil)  यांनी केले होते.अखेर आज ते शिंदे गटात सामील झाले.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर