Hello Krushi App : फक्त 2 मिनिटात आणि फुकटमध्ये मोजा तुमची जमीन; शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय ‘हे’ App

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Krushi App : शेतकरी मित्रानो, शेतजमिनीवरच आपलं जीवन अवलंबून असत. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून बळीराजाचं देशाचा तारणहार आहे. परंतु शेतात काम करत असताना, वेगवेगळी पिके घेत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यातील एक गोष्ट म्हणजे जमीन मोजणी (Jamin Mojani) . अनेकदा दोन सक्ख्या शेजाऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद होताना आपण बघितलं असेल. माझा बांध तू रेटला किंवा तुझी सरी माझ्या हद्दीत आली असं म्हणत अनेकदा काहीजण भांडणेही करतात. अशावेळी सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं कि शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं अन पैसे भरणं अनेकांना नको वाटतं. यापार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून जमीन (Land Measurement) कशी मोजायची याबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. तसेच ७/१२ उतारा (Satbara Utara), भूनकाशा आदी कागदपत्र सोप्प्या पद्धतीने डाउनलोड कारण्याच्याबाबत महत्वाची Trick सुद्धा सांगणार आहोत.

सध्या तंत्रज्ञानाने माणसाची कामे एकदम सोपी केली आहेत. असच एक अँप आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Hello Krushi असे या अँपचे नाव असून सर्वांसाठी हे अगदी मोफत आहे. तुम्हाला Hello Krushi App च्या माध्यमातून तुमची जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, सर्व पिकांचा बाजारभाव यांसारख्या असंख्य सुविधा मिळत आहेत. येव्हडच नव्हे तर हॅलो कृषी वरून कोणत्याही सरकारी योजनेला तुम्ही फक्त एका क्लीकवर अर्ज करू शकता. महत्तवाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. यासाठी आजच Hello Krushi हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.

जमिनीची मोजणी मोबाईलवरून कशी करायची? 

शेजाऱ्यासोबतचा हद्दीवरुनचा वाद असो वा तुमच्या जमिनीत कंपाऊंड करण्यासाठी तुम्हाला लांबी मोजायची असो Hello Krushi मोबाईल अँप यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार कराल तेव्हा जमिनीच्या लांबी- रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला यामुळे मिळेल. चला तर मग, जमिनीची मोजणी करण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा.

१) सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करा.
२) यानंतर मोबाईलवर Hello Krushi हे अँप डाउनलोड करून घ्या.
३) आता तुमचे नाव, मोबाईल नंबर, गाव, तालुका आदी माहिती भरून हॅलो कृषीवर मोफत रजिस्ट्रेशन करा.
४) हॅलो कृषी अँप ओपन करताच तुम्हाला होम स्क्रीनवर बातम्या, सरकारी योजना, जमीन मोजणी, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, पशुपालन, हवामान, सातबारा व भूनकाशा आदी विभाग दिसतील.
५) यामधील जमीन मोजणी या विभागावर क्लिक करा.
६) आता तुम्हाला उपग्रहावरून दिसणारे तुम्ही उभे असलेले ठिकाण दाखवले.
७) आता तुम्हांला जी जमीन मोजायची आहे त्याचे एक -एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
८)) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.
९) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याची आकडेवारी तुम्हाला दिसेल.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा मिळतात ? Hello Krushi App 

1) हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करून आर्थिक लाभ घेता येतो.
2) हॅलो कृषी app च्या माध्यमातून तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज (Havaman Andaj) अचूकपणे समजतो.
3) महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव समजतो.
4)तुम्ही अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, फेरफार उतारा, भू- नकाशा काढू शकता.
5) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने 1 रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
6)तुमच्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
7) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
8) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.
9) जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येते. यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. यामुळे तुमचे अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होते.

शेतकरी मित्रानो, हॅलो कृषी हे अँप (Hello Krushi App)  शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्याला शेती करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. जगाचा पोशिंदा असेलल्या शेतकऱ्याला अगदी मोफत मध्ये या सर्व सेवांचा लाभ फक्त हॅलो कृषीच्या माध्यमातूनच घेता येतोय. त्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या.