सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारच्या ग्रेड सेपरेटर मधून कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा पायी प्रवास या बातमीची दखल घेत विद्यार्थ्यांची जनजागृती करण्याचं काम वाहतूक शाखेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. यापुढे जीव धोक्यात घालून काॅलेजच्या विद्यार्थ्यांना ग्रेड सेपरेटमध्ये नो एंन्ट्री केली आहे. भुयारी मार्गात अनेक वाहने भरधाव वेगाने येत असल्याने या मार्गावरील प्रवेश हा अपघाताला निमंत्रण देणारा आहे.
सातारा शहरात वाढत्या वाहनांचा विचार करून भुयारी मार्ग महणजेच ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. पण फक्त वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या या भुयारी मार्गातून महाविद्यालयाचे विद्यार्थी जीव धोक्यात घालून रोज ये- जा करतायत. मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी शॉर्टकट म्हणून या भुयारी मार्गाचा अवलंब करतात. मात्र, या मार्गाने वाहने वेगाने येत जात असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू शकतो मात्र याकडे विद्यार्थी आणि प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करतायत.
ज्या भुयारी मार्गावर विद्यार्थ्यांचा हा धोकादायक पायी प्रवास सुरू आहे ग्रेड सेपरेटर विद्यार्थ्यांचा जीव घेणार का? जीव गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? या असा प्रश्न हॅलो महाराष्ट्रने उपस्थित केला होता. यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन ग्रेड सेपरेटर मध्ये जाणाऱ्या मुलांना आणि मुलींना हॅलो महाराष्ट्राच्या बातमीनंतर विद्यार्थ्यांची जनजागृती करून त्यांना या गैरसिपरेटरमधून येणं जाणं धोक्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि नवीन नियुक्त वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यादव यांचं सातारकराच्यांतून कौतुक केले जात आहे.