व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

कराड | राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे या पुरस्काराचे उद्या सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

प्रसार माध्यम क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून सकलेन मुलाणी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरणासाठी प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, गटविकास अधिकारी मीना सांळुखे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, नायब तहसिलदार बबनराव तडवी, अरूण भिसे, मनोज पाटील, समाजसेवक सलीम मुजावर, बी. एम. गायकवाड, सुनिल बामणे, प्रविण लादे, कादर नायकवडी आदी उपस्थित राहणार आहेत.

आप्पासाहेब गायकवाड म्हणाले, समाजात पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी हाच उद्देश ठेवून सदरचा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सकलेन मुलाणी यांनी अनेक सामाजिक विषयावर चांगल्या पध्दतीने आवाज उठविला आहे. त्यामुळे कराड शहरासह तालुक्यातील अनेक सामान्य लोकांना न्याय मिळाला आहे.