10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे विविध रिक्त (CISF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांच्या तब्बल 451 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

भरती प्रकार – सरकारी

पद संख्या – 451 पदे

भरले जाणारे पद – (CISF Recruitment 2023)

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 183 पदे
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 268 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – 10 वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना (HMV/TV)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 22 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

मिळणारे वेतन –

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर – रुपये 21,700/- ते 69,100/- दरमहा

कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) – रुपये 21,700/- ते 69,100/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-

SC/ST – फि नाही (CISF Recruitment 2023)
PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट www.cisf.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in