रस्त्यात पेट्रोल संपलं तर काय करायचं? डायल करा ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक

petrol run out on road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकदा आपण लांब पल्याच्या प्रवासाला निघतो आणि अचानक भर रस्त्यात गाडीतला पेट्रोल संपते . परंतु तुम्हाला माहितीये का अश्या अडचणीच्यावेळी तुम्ही टोल नाक्यावरून मदत मिळवू शकता. तसेच काही हेल्पलाईन क्रमांकांची मदत घेऊन अडचण दूर करू शकता. आपण रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा रस्त्यात टोल नका लागतो. तुम्हाला माहितीये का तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत टोल नाक्याद्वारे तुम्हाला मदत मिळू शकते. रस्त्यावर प्रवास करतो म्हणून टोल नाक्यावर पैसे द्यावे लागतात. परंतु बऱ्याच जणांना हे माहित नाही कि आपत्कालीन परिस्थितीत टोल नाक्यावरून मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला काही टोल फ्री क्रमांकावर कॉल लावावा लागेल.  कोणते आहेत हे क्रमांक जाणून घेऊयात ?

1) पेट्रोल संपल्यानंतर ह्या क्रमांकाचा वापर करा

अनेकदा रस्त्यात पेट्रोल संपल्यानंतर पेट्रोल पंप जर जवळपास नसेल तर लांब चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र अश्यावेळी तुम्ही आहात त्या जागेवर तुम्हाला मदत मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या टोल टॅक्स पावतीवर जो हेल्पलाईन क्रमांक दिला आहे त्यावर तुम्ही कॉल करून मदत मिळवू शकता. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 8577051000 आणि 7237999944 यावर तुम्ही कॉल करू शकता. कॉल केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळात मदत मिळते. मात्र त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. परंतु अडचण दूर होते.

2) वाहन बिघडल्यावरही मिळते मदत

प्रवास करताना अचानक आपली गाडी बंद पडते. त्यामुळे पुढचा प्रवास थांबतो. मात्र तुम्ही जर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते. याकरिता तुम्हाला 8577051000 आणि 7237999955 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागतो. यावर्ती कॉल केल्यानंतर तुम्हाला लगेच मेकॅनिक मिळू शकतो. ही सुविधा फ्री असली तरी  जर तुमच्या गाडीत बिघाड असेल तर मेकॅनिक शुल्क आकारू शकतो.

3) मेडिकल इमर्जन्सीमध्ये करा डायल हा क्रमांक

अनेकदा प्रवासात भर रस्त्यात अपघात होतात. जर हॉस्पिटल जवळ नसेल तर लवकर मदत न मिळाल्यामुळे अघटीत घटना घडतात. मात्र तुम्ही जर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला तर अश्या घटना घडण्यापासून वाचू शकतात. त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेच्या 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तुम्ही मोफत ॲम्बुलन्स मिळवू शकतात. यासोबतच तुम्ही अडचणीच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 किंवा 108 वर कॉल करून मदत मिळवू शकता.