हॅलो महाराष्ट ऑनलाईन। आज १७ एप्रिल रोजी जगभरात ‘हिमोफिलिया डे’ (Hemophilia) साजरा केला जातो. हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. ज्याबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा आजार अत्यंत दुर्मिळ मात्र गंभीर स्वरूपाचा मानला जातो. या आजराविषयी बऱ्याच लोकांना अद्याप माहिती नाही. यामुळे लोकांमध्ये हिमोफिलियाविषयी जागरूकता नाही. परिणामी अनेक लोक या आजराचे शिकार होतात आणि आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांना मुकतात. चला तर या आजाराविषयी सविस्तर माहिती घेऊया.
हिमोफिलिया हा आजार नेमका काय आहे? (Hemophilia)
हिमोफिलिया हा आजार एक रक्तविकार आहे. जो अनुवांशिक स्वरूपात होतो. ही एक जीवघेणी- रक्तस्त्राव स्थिती आहे. यामध्ये जेव्हा आपल्याला मोठी जखम वा कापले गेले तर प्रचंड रक्तस्त्राव होऊ शकतो. हिमोफिलिया ही एक स्थिती आहे जी शरीराच्या रक्ताच्या गुठळ्या प्रभावीपणे तयार करण्यास असामर्थ्य दर्शविते. त्यामुळे या आजरावर वेळीच उपचार घ्यायला हवे.
हा आजार सर्वाधिक कुणाला प्रभावित करतो?
माहितीनुसार, हिमोफिलिया (Hemophilia) हा आजार प्रामुख्याने पुरुषांना प्रभावित करतो. यामध्ये प्रभावित नसलेल्या व्यक्तीचा रक्तस्त्राव सौम्य किंवा मध्यम असल्यास, रक्तस्त्राव स्वतःच थांबतो. आपल्या शरीरातील रक्त गोठण्याच्या क्रियेमुळे ही परिस्थिती येते. अशावेळी जखमेच्या ठिकाणी जाड प्लग तयार होतो. ज्यामुळे रक्तस्त्राव थांबतो. तर हिमोफिलियाने ग्रस्त व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असेल तरीही दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो. मुख्य म्हणजे, कोणत्याही कारणाशिवाय सांधे किंवा स्नायूंमध्ये उत्स्फूर्त रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे व्यक्ती कमकुवत होऊ शकते.
कशामुळे होतो?
तज्ञ मंडळी सांगतात की, हिमोफिलिया हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विशिष्ट क्लोटिंग घटकांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. हा आनुवंशिक रित्या पुरुषांना सर्वाधिक प्रभावित करतो. कारण पुरुषांमध्ये फक्त X गुणसूत्र असते. त्यामुळे जर त्यात दोषपूर्ण जनुक असेल तर ते हिमोफिलिया आजाराचे कारण ठरू शकतात. (Hemophilia) तसेच एखाद्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो आणि तो थांबवण्यासाठी शरीर रक्त पेशी गोळा करते तेव्हा त्याचा गठ्ठा होतो. याला ‘क्लोटिंग फॅक्टर’ म्हणतात. तेव्हा गोठण्याचे घटक अनुपस्थित असतात किंवा अपर्याप्त प्रमाणात उपस्थित असतात. अशा परिस्थितीत ‘हिमोफिलिया’ होतो.
हिमोफिलियाची लक्षणे
- असामान्य रक्तस्त्राव
- लघवी वा मलत्याग करताना रक्त येणे
- मूत्र किंवा मलमध्ये रक्त पडणे
- मोठी खोल जखम होणे (Hemophilia)
- सांध्यांमध्ये वेदना वा सूज
- कारणाशिवाय नाकातून रक्तस्त्राव
हिमोफिलियाचे प्रकार
हिमोफिलियाचे एकूण २ मुख्य प्रकार आहेत. ज्यातील हिमोफिलिया A हा प्रकार घटक VIII च्या कमतरतेमुळे होतो. तर हिमोफिलिया B हा प्रकार घटक IX च्या कमतरतेमुळे होतो. याशिवाय हिमोफिलियाच्या तीव्रतेचे एकूण ३ प्रकार आहेत. सौम्य, मध्यम आणि गंभीर. (Hemophilia) यातील सौम्य प्रकारात व्यक्तीचे गुणक ५% ते ४०% इतके असते. तर मध्यम प्रमाणात १% ते ५% आणि गंभीर प्रमाणात १% पेक्षा कमी असू शकते.
कशी काळजी घ्याल?
हिमोफिलियाग्रस्त रुग्णांनी रक्तस्त्राव टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा रुग्णांनी इजा होईल अशी सर्व कामे टाळावीत. तसेच हिमोफिलियाची तीव्रता तपासून घ्यावी. तज्ञांकडून सल्ला घेऊन विशिष्ट उपचार पद्धतींचे पालन करावे. (Hemophilia)