महिलांसाठी या आहेत सर्वोत्तम पेन्शन योजना!! दरमहा मिळतात 45 हजार रूपये

0
1
pension plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आताच्या घडीला महिला या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रगतीला आर्थिक बळ मिळावे यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच त्यांच्यासाठी अनेक विविध पेन्शन देखील आणल्या जात आहेत. परंतु, या पेन्शन आणि त्याबाबतची माहिती खुद्द महिलांनाच नाहीये. त्यामुळे आजच्या लेखात आपण विविध पेन्शन योजनांविषयी जाणून घेणार आहोत.

अटल पेन्शन योजना

गुंतवणुकीचा पर्याय पाहता अटल पेन्शन योजना महिलांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न जास्त नाही अशा महिला या योजनेचा सहज लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो. पुढे वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर दरमहा 1000 ते 5000 पेन्शन मिळण्यास सुरूवात होते.

राष्ट्रीय पेन्शन योजना

म्हातारपणाचा आर्थिक आधार म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजना महिलांसाठी महत्त्वाची ठरते. या योजनेअंतर्गत एका महिलेने वयाच्या 30 व्या वर्षी 5000 रुपये गुंतवले तर तिला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 45,000 रुपये पेन्शन मिळते. अशा पद्धतीने महिला वर्ग वेगवेगळ्या पेन्शन योजनांचा लाभ घेऊ शकतात.

यूएलआईपी योजना

गुंतवणुकीचा सर्वोत्तम युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन या योजनेकडे पाहिले जाते. युनिट इन्शुरन्स मध्ये पैसे गुंतवल्यास आपल्याला मुदतपूर्तीनंतर नियमित पेन्शनचा लाभ घेता येतो. याच्यामध्ये जीवन विम्यासोबतच गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या अनेक महिला या योजनेचा फायदा घेताना दिसत आहेत.

म्युच्युअल फंड

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून म्युच्युअल फंड आहे. यामध्ये तुम्ही SIP अंतर्गत मासिक प्रीमियम भरू शकता. यामध्ये तुम्हाला एका कालावधीनंतर फंडाची रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.