आज महात्मा गांधी हयात असते तर.., मोदींची तुलना गांधीजींशी करत उपराष्ट्रपतींचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. अशातच भारताच्या उपराष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच, उपराष्ट्रपतींनी केलेले हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे काँग्रेसच्या एका खासदारांने म्हणले आहे.

उपराष्ट्रपती काय म्हणाले?

सोमवारी मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बोलवण्यात आले. या कार्यक्रमात बोलतानाच धनखड मम्हणाले की, “मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील शतकामध्ये महात्मा गांधींसारखे महापुरुष होऊन गेले. या शतकातील युगपुरुष नरेंद्र मोदी आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांच्या गुलामीमधून देशाला मुक्ती मिळवून दिली. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला प्रगतीपथकावर नेलं”

त्याचबरोबर, “आज महात्मा गांधी हयात असते तर या कार्यक्रमांचं कौतुक केलं असतं,” असे देखील जगदीप धनखड म्हणाले. धनखड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. तसेच, “तुम्ही महात्मा गांधींशी मोदींची तुलना करत असाल तर हे फार लज्जास्पद आहे. अशा पद्धतीने वागल्यास तुम्ही ज्या पदावर आहात त्याचा सन्मान राखला जात नाही” अशी टीका काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी धनखड यांच्यावर केली आहे.