हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरोच्या गाड्यांची क्रेझ भारतात काही नवी नाही, नवीन गाडी खरेदी करताना आपण नेहमीच हिरोच्या दुचाकीला पहिली पसंती दर्शवतो. ग्राहकांची वाढती मागणी आणि बदलत्या काळानुसार वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन कंपनी सुद्धा ग्राहकांना हवी तशी गाडी तयार करण्याकडे मानसिकता दाखवत असते. नुकतीच Hero MotoCorp ने त्यांचे प्रसिद्ध मॉडेल Hero HF Deluxe अपडेटेड व्हर्जन मध्ये लाँच केली आहे. या गाडीची किंमतही सर्वसामान्य माणसाला परवडेल अशीच आहे. चला आज आपण जाणून घेऊया अपडेटेड Hero HF Deluxe च्या खास वैशिष्ट्यांबद्दल….
नवीन Hero HF Deluxe 4 रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे, यामध्ये Nexus Blue, Candy Blazing Red, Heavy Gray with Black आणि Black with Sports Red यांचा समावेश आहे. या रंगांमुळे हिरोची ही बाईक आधीच्या मॉडेल पेक्षा खूपच आकर्षक दिसते. बाइकमध्ये सस्पेन्शनसाठी आणि ब्रेकिंगसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस ड्युअल शॉक सस्पेंशन तसेच दोन्ही चाकांवर 130mm ड्रम ब्रेक आणि हॅलोजन हेडलॅम्प यांचा समावेश आहे.
इंजिन –
गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास Hero HF Deluxe मध्ये कंपनीने आधीसारखेच 97.2 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह दिले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले असून ते 8,000 rpm वर 7.9 bhp आणि 6,000 rpm वर 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
किंमत किती?
कंपनीने आपली HF Deluxe २ व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. यामधील किक व्हेरियंटची किंमत 60,760 रुपयांपासून सुरू होते आणि सेल्फ-स्टार्ट व्हेरियंटची किंमत 66,408 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.कंपनी या गाडीच्या खरेदीवर ५ वर्षाची वॉरंटी आणि ५ फ्री सर्व्हिसिंगची सेवा सुद्धा देत आहे. कमी खर्चात परवडणारी बाईक म्हणून तुम्ही Hero HF Deluxe च्या अपडेटेड गाडीकडे पाहू शकता. हिरो ची ही बाईक भारतीय बाजारपेठेत नवीन Honda Shine 100, Bajaj Platina सारख्या इतर गाड्यांशी स्पर्धा करेल .