Hero Xoom : हिरोची ‘ही’ दमदार Scooter Activa ला देणार तगडी टक्कर; किंमतही कमी

Hero Xoom
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero Motocorp ने आपली 110cc वाली स्कूटर Hero Xoom लाँच केली आहे. Hero Xoom दिसायला अतिशय स्पोर्टी असून या गाडीची थेट टक्कर होंडा Activa आणि TVS ज्युपिटरशी होणार आहे. आज आपण जाणून घेऊया हिरोच्या या दमदार स्कुटरची काही खास वैशिट्ये आणि तिच्या किमतीबाबत…

किंमत किती –

Hero ची ही नवी स्कुटर शीट ड्रम, कास्ट ड्रम आणि कास्ट डिस्क या 3 व्हेरिएन्ट मध्ये येते. हीरो झूम स्कूटर देशभरातील हिरो मोटोकॉर्प डीलरशिपवर उपलब्ध आहे. या गाडीच्या LX-Sheet Drum या व्हेरिएन्टची सुरुवातीची किंमत 68,599 रुपये ठेवण्यात आली आहे. VX-कास्ट ड्रम या व्हेरिएन्टची किंमत 71,799 रुपये आणि ZX- कास्ट ड्रमची किंमत 76,699 रुपये आहे.

इंजिन – (Hero Xoom)

Hero Xoom ला 110 cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.05 PS ची पीक पॉवर आणि 8.70 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. हे इंजिन कंपनीच्या XTEC आणि i3S तंत्रज्ञानासह येते. हिरो झूमच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12-इंच अलॉय व्हीलसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतात.

या कलर पर्यायात खरेदी करा –

हिरो झूम पाच स्पोर्टी, आकर्षक (Hero Xoom) रंगांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या गाडीचे LX-Sheet Drum व्हेरिएन्ट पोलेस्टार ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे, VX-कास्ट ड्रम व्हेरिएंट पोलेस्टार ब्लू, ब्लॅक आणि पर्ल सिल्व्हर व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे. कास्ट डिस्क व्हेरिएंट पोलेस्टार ब्लू, ब्लॅक, स्पोर्ट्स रेड आणि मॅट अब्राक्स ऑरेंज कलर मध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

हे पण वाचा :

Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?

Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा

Cheapest Electric Scooters : या आहेत सर्वात स्वस्त Electric Scooters; स्पीड आणि मायलेजही जबरदस्त

Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?