हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या चार दशकांपासून आपल्या देशात सुरु असलेला दुचाकी गाड्यांचे उद्पादन हे उत्तरोत्तर वाढतच गेले आहे. अनेक वेगवेगळ्या गाड्या अपडेटेड फीचर्स सह बाजारात लाँच होत आहेत. त्यातच आता भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने अद्यावत आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज Xpulse 200 4V (2023 Hero Xpulse 200 4V) दुचाकी स्पोर्ट्स बाईक लाँच केली आहे. या बाईकची सुरवातीची एक्स शोरूम किंमत हि 1.44 लाख रुपये आहे.
लुक आणि डिझाइन-
हिरोची ही एंट्री-लेव्हल एडव्हेंचर मोटरसायकल आता दोन प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. यात नवीन फीचर्ससह अपडेटेड इंजिन देण्यात आले आहे. डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर ह्यात अद्ययावत XPulse 200 4V ला नवीन 60 मिमी लांब व्हायझर , अपडेटेड स्विच गियर, H-आकाराचे LED DRL सह ऑल-एलईडी हेडलॅम्प मिळतात. पूर्वीच्या तुलनेत रायडर ट्रँगलमध्येही बदल करण्यात आला आहे. वास्तविक, रायडरच्या पायांची री पोजिशनिंग करून फूट पेगची जागा बदलण्यात आली आहे. Hero XPulse 200 4V ला आता मल्टिपल ABS मोड -रोड, ऑफ-रोड आणि रॅली आहे.
इंजिन –
नवीन Xpulse 200 4V मध्ये 199.6cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, फोर-स्ट्रोक, फोर-व्हॉल्व्ह इंजिनद्वारे बसवण्यात आले आहे जे 8,500 RPM वर 18.9 bhp आणि 6,500 RPM वर 17.35 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तथापि, OBD-2 शी इंजिन अनुकूल असून ते E20 इंधनावर देखील चालू शकते. आणि ते 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. 2023 Hero XPulse 200 4V दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे – स्टँडर्ड आणि प्रो.
किंमत किती?
हिरोच्या या बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1.44 लाख रुपये आहे तर प्रो व्हेरिएंटची किंमत 1.51 लाख रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.