व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गाडीचे Tyre काळ्या रंगाचेच का असतात? कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गाड्यांच्या टायरचा आकार, कंपनी आणि रेखीवता हे भिन्न असू शकतात मात्र सर्वच गाड्यांच्या TYRE’S चा रंग मात्र काळाच असतो. असे का ? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात TYRE च्या काळ्या रंगाची गोष्ट त्यामागील कारणे.. . जेव्हा तुम्ही कार किंवा बाईक खरेदीसाठी जाता तेव्हा तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगांचा पर्याय उपलब्ध असतो. काहींना पांढऱ्या रंगाची कार आवडू शकते, तर काहींना लाल किंवा चांदीची कार आवडू शकते. तथापि, टायर खरेदी करताना, कोणत्याही रंगसंगतीचा पर्याय उपलब्ध नसते .

१२५ वर्षांपूर्वी टायर्सचा रंग पांढरा असायचा कारण ते दुधाळ रंगाचे रबर वापरत. पण आजच्या काळात टायर मजबूत बनवण्यासाठी इतर साहित्याचा वापर केला जातो. मजबूत TYRE मुळे वाहनांना चांगला वेग येतो आणि ते गाडीचा संपूर्ण भार उत्तमरीत्या वाहू शकतात. जुन्या काळातील टायर खूपच कमकुवत होते, त्यामुळे ते भार सहन करू शकत नव्हते आणि वेगाने जाऊ शकत नव्हते.

टायरमध्ये कार्बन ब्लॅक हा मुख्य घटक असतो जो जास्त पकड आणि ट्रेड पॅटर्न प्रदान करतो. कार्बन ब्लॅक सूर्यप्रकाश, उच्च तापमान आणि विविध हवामान परिस्थितींना टायर प्रतिरोध प्रदान करण्यास सक्षम आहे. या व्यतिरिक्त, काळ्या रंगामुळे टायरचे उच्च ट्रीड लाइफ देखील वाढवते. आजच्या घडीला टायर्समध्ये विविध तांत्रिक प्रगती करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ते सुरक्षित, टिकाऊ होतात. ह्या सर्व बाबींमुळे गाडीच्या TYRE चा रंग हा काळाच असतो.