गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानची बोट पकडली; 400 कोटींचे ड्रग्ज जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातमध्ये भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. या कारवाईत भारताच्या जल हद्दीत 6 चालकांसह पाकिस्तानी नाव (Boat) ताब्यात घेण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या या बोटीचे नाव ‘अल हुसेनी’ असे आहे. या बोटीत सहा क्रू सदस्य होते.

भारतीय जलक्षेत्रात ही बोट पकडण्यात आल्याची माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत ‘ पीआरओ डीफेन्स गुजरात’ या अधिकृत ट्वीटर हँडवरून तपशील देण्यात आला आहे

दरम्यान, या वर्षी एप्रिलमध्ये, तटरक्षक दल आणि एटीएसने अशीच कारवाई केली होती आणि कच्छमधील जाखाऊ किनार्‍याजवळील भारतीय पाण्यावरून आठ पाकिस्तानी नागरिकांसह आणि सुमारे १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन असलेली बोट पकडली होती.