आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कुणाच्या पोठावर येवून देणार नायं पाय, यासाठीच आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय, मायबाप सरकार आमची विनंती ऐका, आम्ही कोरोनाला हद्दपार करणार आहोत अशा घोषणा देत सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला विरोध करित दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या काही दिवसांवर लग्नसराई तसेच पाडव्याचा सण आहे. दुकानदारांनी माल भरलेला आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांची फसवणूक केलेली आहे. अन्यायकारक निर्णय आहे, कुठल्याही प्रकारचा विचार न करता व्यापाऱ्यांच्यावर निर्णय लादला आहे. व्यापाऱ्यांमुळे कोरोना होतो, असा प्रशासनाचा म्हणणे आहे. प्रशासनाने अजूनही निर्बंध कडक करावेत, दंड जादा आकारावा, परंतु बंद नको अशी मागणी सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

आम्ही सर्व नियम पाळत आहे. आम्ही वीकेंड लाॅकडाऊनसाठी शासनाबरोबर आहोत. परंतु जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने आमच्या जगण्यावर गदा आली आहे. त्याला आमचा विरोध राहणार आहे. प्रशासनाने आमचा विचार केलेला नाही, तसेच चर्चाही केली नाही. त्यामुळे आम्ही दुकाने  चालूच ठेवणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रशासनाने विश्वासात न घेतलेला निर्णय बदलवा, अन्यथा उद्रेक होईल ः आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सरसकट बंद म्हणजे मुगलाई आहे. व्यापारी थांबायला तयार नाही. निर्णय बदलला पाहिजे, अन्यथा लोकांच्यात उद्रेक होईल. रस्त्यांवर विक्री करतायत त्याला परवानगी मग दुकानदारांना का बंदी असा प्रश्न आ. भोसले यांनी केला आहे.

आ. भोसले म्हणाले, जिल्हा प्रशासन विश्वासात न घेता निर्णय घेत आहे. आफिसमध्ये बसून निर्णय घेत आहेत. तो राबवायचा त्यामुळे लोकांच्यात नाराजी होवू शकते.  मी पालकमंत्र्यांशी बोलेन. जिल्हा प्रशासनाने फेरविचार करावा. जास्तीत जास्त काय होईल तर १४४ कायदा मोडले म्हणून जेलमध्ये बसावे लागेल. धंदा बंद करून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेले चांगलं.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment