High Blood Pressure | ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब ही आजकाल सगळ्यांनाच होणारी सामान्य समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक लोक पीडित आहेत. जेव्हा रक्ताची शक्ती धमनीच्या भिंतीवर जास्त प्रमाणात येऊ लागते. त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. उच्च रक्तदाब हा अनुवंशिककारणा व्यतिरिक्त आपल्या वाईट सवयींमुळे देखील वाढतो. जसे की बैठे जीवनशैली, आपला लठ्ठपणा, सोडियमचे जास्त सेवन किंवा मद्यपान यासारख्या सवयीमुळे रक्तदाबाची समस्या वाढते. त्यामुळे आपल्याला आपल्या या सवयीवर नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच आपण तंदुरुस्त राहू शकतो. आता कोणकोणत्या सवयींमुळे आपला रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात ठेवता येतो? हे जाणून घेणार आहोत.
वजन नियंत्रणात ठेवा | High Blood Pressure
ज्या लोकांचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठ आहे त्यांना उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो. तुमच्या वाढलेल्या वजनाच्या 5 ते 10% कमी केल्याने रक्तदाबात लक्षणीय फरक पडतो.
नियमित व्यायाम करा
रोज नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. दिवसातून कमीतकमी 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा जसे की वेगवान चालणे, सायकल चालवणे, पोहणे इ. अशा व्यायामामुळे नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढते. नायट्रिक ऑक्साईड रक्त प्रवाह वाढवते आणि रक्तदाब कमी करते.
पूरक आहार घ्या
मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि फॉलिक ॲसिड यांसारख्या सप्लिमेंट्समुळे रक्तदाब कमी होतो. जरी, डॉक्टर दैनंदिन दिनचर्यामध्ये पूरक आहार घेण्याच्या सूचना देत नाहीत, परंतु विशेष परिस्थितीत ते पूरक आहार घेण्याच्या सूचना देऊ शकतात.
कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन करू नका
हे साखर आणि कॅलरीजमध्ये समृद्ध आहेत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि नंतर उच्च रक्तदाब होऊ शकतो. यामुळे एथेरोस्क्लेरोसिस देखील होऊ शकते, म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने रक्तदाब कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन कमी करण्याची शिफारस केली आहे.
पुरेशी झोप घ्या | High Blood Pressure
सामान्य झोप घेतल्याने रक्तदाब संतुलित राहतो. पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. चांगली झोप कॉर्टिसॉल सारख्या तणाव संप्रेरकांवर नियंत्रण ठेवते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.