High BP Symptoms | रात्री झोपेत ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर सावधान; असू शकतो हाय बीपीचा धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

High BP Symptoms | वाढता रक्तदाब आज काल मोठ्या प्रमाणात लोकांची समस्या बनत चाललेली आहे. त्यामुळे रक्तदाबाच्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे खूप गरजेचे आहे. हा रक्तदाब टाळण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी रक्तदाबाची लक्षणे वेळेतच ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल.

ज्या लोकांना हाय बीपी (High BP Symptoms) असतो किंवा उच्च रक्तदाब असतो. त्यांना अनेकवेळा ही लक्षणे स्पष्ट अशी दिसत नाही. उच्च रक्तदाबाची लक्षणे लोकांना माहीत नसतात. कारण एक तर ती खूपच किरकोळ असतात. किंवा रात्री झोपताना दिसतात. त्यामुळे रात्री लोकांनाही लक्षणे ओळखता येत नाही. आता ही लक्षणे कोणती आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत

थकवा | High BP Symptoms

दिवसभर थकल्यासारखा वाटणे अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु जास्त वेळ विश्रांती घेऊन देखील तुम्हाला जर आराम वाटत नसेल, तर तुम्हाला उच्च रक्तदाब समस्या असू शकते. आता यावर नेमके उपचार घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या आणि आवश्यक त्या चाचण्या करून घ्या.

वारंवार लघवीला जाणे

तुम्हाला जर रात्री वारंवार लघवीला उठावे लागत असेल, तर ही देखील उच्च रक्तदाबाची एक समस्या असते. जे लोक रात्री वारंवार लघवीला जातात. त्यांची झोप देखील व्यवस्थित होत नाही. आणि त्यामुळे थकवा निर्माण होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास अधिक होतो.

पायांना सूज येणे

पायांना सूज येणे आणि वेदना होणे हे उच्च रक्तदाबाचे एक लक्षण आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा सकाळी उठल्यावर तुमच्या पायात जर जास्त सूज दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

श्वसनविषयी दाह | High BP Symptoms

तुम्हाला जर विश्रांती घेत असताना श्वास घेताना त्रास होत असेल, तर तुम्हाला उच्च रक्तदाबाशी त्रास असू शकतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. तुम्हाला जर रात्री अशी काही लक्षण दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.