High Carb Food | असं म्हणतात की आपले आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असते. आपले जर आरोग्य ठीक असेल तर आपण या जगात कुठलेही गोष्टी करू शकतो. पण जर आरोग्य ठीक नसेल असेल तर आपल्याला काहीही करता येत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीराला विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कॅल्शियम या सगळ्या पोषक तत्वांची गरज असते. केवळ एकाच प्रकारचे पदार्थ खाऊन आपल्या शरीरातला त्याचा फायदा होत नाही.
त्याचप्रमाणे आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटची (High Carb Food) देखील गरज असते. अनेक लोक असतात जे त्यांचे वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारातून कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ खात नाही. परंतु ते खूप चुकीचे आहे. कार्बोहायड्रेटमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे त्याचे सेवन दररोज करणे खूप गरजेचे आहे. आता आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया. यामध्ये कार्बोहायड्रेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला चांगला लाभ होणार आहे.
क्वीनोआ
हे खूप पौष्टिक अन्न आहे. शाकाहारींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. गव्हाऐवजी तुम्ही जर क्वीनोआचा समावेश केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल.
ओट्स | High Carb Food
ओट्स हे अतिशय निरोगी असे कार्बोहायड्रेट आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर असतात त्याचप्रमाणे त्यामुळे पचन संस्था देखील व्यवस्थित चालते. ओट्सच्या सेवनाने रक्तातील साखळीची पातळी नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात देखील ओट्सचा मदत होते.
केळी
केळी देखील कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्त्रोत आहे. यामध्ये पोटॅशियम बी 6 आणि व्हिटॅमिन सी यांसारखे घटक आढळतात.
कॉर्न
कॉर्न हे कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात असणाऱ्या कार्बोहायड्रेटची संख्य देखील कमी होत नाही. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्यापासून बचाव होतो.