High Fd Rate Banks | आजकाल आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक सेविंग करत असतात. त्यात एफडी अनेक लोक करत असतात. परंतु सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर खूप जास्त व्याजदर मिळतो. आणि परताव्याच्या या वाढीव दरामुळे त्यांना त्यांच्या मालमत्तेवर देखील चांगला परतावा मिळतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना असतात. जेणेकरून त्यांना आर्थिक मागणी पूर्ण करताना सुरक्षित आणि सेवानिवृत्तीचे हमी देता येते. त्यामुळे त्यांची ही गरज लक्षात घेऊन आयकर कायद्याच्या कलम 80TTP अंतर्गत त्यांच्या मिळालेल्या उत्पन्नावर 50 हजार रुपयांची वजावट मिळू शकते.
आता आपण अशा काही बँकांबद्दल जाणून घेणार आहोत. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवीवर उच्च व्याजदर देतात
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक | High Fd Rate Banks
इक्विटा स्मॉल फायनान्स बँक ही 7 दिवस ते 10वर्षापर्यंत ठेवीच्या कालावधीसाठी. 4 टक्के ते 9 टक्के पर्यंत एफडीवर व्याज देते. त्याचप्रमाणे 440 दिवसात होणाऱ्या एफडीवर सगळ्यात जास्त म्हणजे 9 टक्के व्याजदर ही बँक देते. म्हणजेच गुंतवणूकदारांना जेवढी ऑफर असते. त्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळते.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
ही बँक जेष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 3.7% ते 9.21% पर्यंत एफडीवर व्याजदर देते. 750 दिवसात होणाऱ्या या एफडीवर 9.21% व्याजदर दिला जातो.
जना स्मॉल फायनान्स बँक
ही बँक जेष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 3.50 ते 9 टक्क्यापर्यंत व्याजदर देते. एफडीचे हे दर 2 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेले आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 4.50 ते 9.10% पर्यंत देते. ही मुदत ठेवीची दर 22 डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात आलेले आहेत.