FD Rates | माणूस वर्तमान जरी जगत असला, तरी त्याला नेहमीच त्याच्या भविष्याची काळजी लागलेली असते. आपल्याला भविष्यात कोणत्याही गोष्टींची अडचणी येऊ नये. यासाठी तो आजच प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे अनेक मार्ग आजकाल उपलब्ध आहेत. परंतु एफडी हा अत्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग आहे. या एफडीमधून तुम्ही चांगली कमाई देखील करू शकता. परंतु अनेकवेळा कोणत्या बँकेत एफडी करावी कोणत्या बँकेचा व्यासदर चांगला आहे. हे आपल्याला कळत नाही आणि आपण चुकीच्या बँकेत एफडी (FD Rates) करतो.
आज आपण अशा काही बँका जाणून घेणार आहोत ज्या एफडीवर खूप चांगला परतावा देत आहेत. या बँकां जास्त व्याजदर ग्राहकांना देत आहे. त्यामुळे तुम्हाला एफडीमधून चांगली कमाई करायची असेल, तर तुम्ही या बँकांना नक्कीच भेट देऊ शकता आता आपण त्या कोणत्या बँका आहेत ज्या चांगल्या व्याजदर देतात हे पाहणार आहोत.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक | FD Rates
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेमध्ये अनेक लोक एफडी करतात. ही बँक सामान्य नागरिकांना त्यांच्या एफडीवर 3.5 75 टक्के ते 8.750% दरम्यान व्याज देत असते. ही बँक पंधरा महिन्यांच्या एफडीसाठी कमाल व्याजदर 8.50% देते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कमाल व्याजदर 9% एवढा आहे. हे नवीन दर 7 मार्च 2024 पासून लागू झालेले आहे.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
ही नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 366 ते 1095 दिवसांच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देते. जेष्ठ नागरिकांना 8.5% दराने व्याज देत आहे. हे व्याज 5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीवर बँक देते. बँक नियमित ग्राहकांना 8.50% दराने तर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के दराने व्याजदर देते.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 3.50 ते 8.70 दरम्यान व्याज देत असते. ज्येष्ठ नागरिकांनाही बँक 4 टक्के ते 9.20% दराने व्याज देते. 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर ही बँक कमाल व्याजदर 8.70% देत असते. जेष्ठ नागरिकांना ही बँक 9.20% कमाल व्याज देते. हे दर 2 मार्च 2024 पासून लागू झालेले आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 4% ते 9.1% पर्यंत व्याज देत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.40% ते 9.25 टक्के दरम्यान ही बँक व्याज देते. बँकेचे हे नवीन व्याजदर 1 मार्च 2024 पासून चालू झालेले आहे.