हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या परीक्षांचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. मात्र त्या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना जसं शक्य असेल तसे त्यांनी परीक्षा ऑफलाईन द्यायची की ऑनलाईन हे कळवावं लागणार आहे. तसा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतलेला आहे. तसेच इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निक सेमिस्टरच्या परीक्षा शंभर टक्के ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलीय
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू केली गेली आहेत. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’