हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नव्या (Hill Stations In Maharashtra) वर्षाची सुरुवात झाली असून अनेकजण नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याच्या विचारात असतात. खास करून जेव्हा तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहत असता तेव्हा कधी एकदा निर्सगाच्या छायेत जातो अन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतोय असं आपल्याला होत. त्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर भारतातील काही सर्वोत्तम हिल स्टेशन्स आहेत. हिरवेगार जंगल, नयनरम्य तलाव, धबधबे, आणि धुक्यानी भरलेले हे हिल स्टेशन्स नक्कीच तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. आज आपण महाराष्ट्रातील अशाच काही हिल स्टेशन्स बाबत सांगणार आहोत. जे तुमच्या शहरापासून अगदी जवळ असतील आणि त्याठिकाणी तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता.
लोणावळा (Lonavala)-
पुणे जिल्ह्यात वसलेले लोणावळा मुंबईपासून फक्त ९६ किमी आणि पुणे शहरापासून ६४ किमी अंतरावर आहे. (Hill Stations In Maharashtra) हे सर्वात लोकप्रिय क्विक वीकेंड गेटवेजपैकी एक आहे. लोणावळ्यात सुंदर धबधबे, अप्रतिम ट्रेकिंग ट्रेल्स, खडकांच्या गुहा आणि हिरवीगार हिरवळ असून पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
माथेरान (Matheran)-
मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान… माथेरान हे (Hill Stations In Maharashtra) अतिशय शांत ठिकाण आहे. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. माथेरान मध्ये मंकी पॉइंट, चार्लोट झील, पैनोरमा पॉइंट, नेरल माथेरान टॉय ट्रेन अशा ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
इगतपुरी (Igatpuri)-
इगतपुरी नाशिक जिल्यात येते. येथील कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली,उंट दरी,पाच धबधबे,अशी सुंदर ठिकाणे आहेत.कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो. तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे.
महाबळेश्वर (Mahabaleshwar)-
निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर (Hill Stations In Maharashtra) हे सर्वांचे आवडीचे ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील हे निसर्गरम्य ठिकाण मुंबई पासून 285 किमी किमी आणि पुण्यापासून 120 किमी अंतरावर आहे. याठिकाणी तुम्ही वळणदार रस्त्यांचा अनुभव घेऊ शकता. खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे महाबळेश्वर मध्ये असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.
खंडाळा (Khandala)- (Hill Stations In Maharashtra)
खंडाळा हे भोर घाटाच्या माथ्यावर वसलेले आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात नैसर्गिकरित्या समृद्ध ठिकाणांपैकी एक आहे. राजमाची पॉइंट, सनसेट पॉइंट, कुणे धबधबा, ताम्हिणी घाट, भाजा आणि कार्ला लेणी आणि भुशी तलाव ही खंडाळ्यातील आणि आसपासची काही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे. तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा अनुभवता येतो. मुंबई ,पुणे व काही जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात.
पाचगणी (Panchgani)-
सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे पाच निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे . उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीची खास वैशिष्ट्ये आहेत. (Hill Stations In Maharashtra) धबधबे असो की दऱ्या किंवा जंगले, पाचगणीत या सर्व गोष्टी अनुभवता येतात. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.
भंडारदरा (Bhandardara) –
तुम्ही एक सुंदर हिल स्टेशन शोधत असाल तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या भंडारदराकडे जावा. भंडारदरा हे साहसी ठिकाणांपैकी एक आहे. सभोवताल हिरवीगार हिरवळ, धबधबे आणि उंच पर्वतांनी वेढलेले शहर पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे. भंडारदरा येथील इतर प्रमुख आकर्षणांमध्ये विल्सन डॅम आणि आर्थर लेकचा समावेश आहे.