हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिला सुरक्षा देण्याचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. सर्वच स्तरांमधून कंगनावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळेच कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तिला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
सध्यपरिस्थितीमध्ये कंगनाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी कंगनाच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यामुळे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
“कंगनाच्या कुटुंबीयांसोबत माझा फोनवर संवाद झाला असून हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल. तसंच हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनादेखील तसे आदेश देण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत जाणार असून हिमाचलच्या मुलीला सुरक्षा देणं यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असं जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे.