साताऱ्याच्या हिंदविंनी 60 गुंठ्यात डाळिंब शेतीतून घेतलं 26 लाखांच उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलाही उतरू लागल्या आहेत. कमी बजेटच्या शेतीतून उत्तम प्रकारे भरघोस उत्पन्न त्या घेऊ लागल्या आहेत. दुष्काळी भाग असो किंवा पाणीदार या भागात महिला शेतकरी आज नावारूपास येत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात निसर्ग साथ देत नसला तरी येथील शेतकऱ्यांनी संघर्ष सोडलेला नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी गावातील महिला शेतकरी हिंदवी गुंजवटे यांनी डाळिंब फळबाग शेतीतून तब्बल 26 लाख रुपयांचं उत्पन्न कमवलं आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याला दुष्काळी तालुका असे म्हंटले जाते. या माण तालुक्यात बिजवडी हे गाव असून या गावात कायम दुष्काळी परिस्थिती असते. अशा दुष्काळी गावात फलटण तालुक्यातील साखरवाडीतील हिंदवी लग्न होऊन आल्या. पदवीधर असलेल्या हिंदवी विशाल गुंजवटे सासरच्या कुटुंबियासमवेत पारंपारिक शेती करू लागल्या परंतु त्यातून उत्पन्न चांगले मिळत नसल्याने त्यांनी डाळिंबाची बाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 60 गुंठे 650 डाळिंबाची झाडे लावली. आणि आता त्या त्यातून वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.

 pomegranate

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात इतर पिके घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तसेच त्याची थेट विक्री करायची असेल तर चिंता Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकांची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

डाळींबाच्या झाडांतून 26 लाख रुपयांचे उत्पन्न पदवीधर असलेल्या हिंदवी गुंजवटे यांनी डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांच्याकडून ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. तसेच डाळिंब शेतीविषयी युट्युबवर यशस्वी शेतकऱ्यांनी आपली डाळिंब कशी फुलवली त्याची माहिती घेतली. हिंदवी गुंजवटे यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांच्या घरी डाळिंबाची बाग होती. तसेच शेतात तरकारी करत असल्याने लहानपणापासून त्यांना शेतातील काम माहिती होते. दिवाळी दरम्यान त्यांनी रुपये किलोनी डाळिंब विकून झाडातून 26 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

डाळिंब शेती

अशी राखली बागेची निगा

हिंदवी या बागेत फुटवे काढणे, खत टाकणे, खुरपणे, औषध मारणे, फळे तोडणे, छाटलेल्या फांद्या, पालापाचोळा बाहेर काढणे, पाचट टाकणे, राखण करणे, पाणी सोडणे आदी कामे त्या स्वत: करत असतात. डाळिंब शेतीत तेल्या व मररोग हे महाभयंकर रोग असून, यामुळे बागा उदध्वस्त होत आहेत. मात्र, यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांना बगल देत झाडांना भरपूर शेणखत, गांडूळ खत व इतर सेंद्रीय खते देऊन ताकद देण्याचे काम करतो. थोडाफार तेलकट आला तरी तो आम्ही बोर्डो तयार करून मारून नियंत्रणात आणले आहे. तर मररोगासाठी दोन महिन्याला बुडक्यात बुरशीनाशक व किटकनाशकाची आळवणी करतात. पाण्याची बचत करण्यासाठी पाचट टाकतो. पावसाळ्यात जास्त पाण्यामुळे कुजवा, डांबऱ्या, प्लेग असे रोग येऊ नयेत म्हणून बागेत बुरशीनाशके , कॉपर, सल्फरची डस्टिंग करतो. क्रॉप कव्हरचा खर्च बऱ्यापैकी होतो, मात्र त्यापासून विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, असे हिंदवी गुंजवटे यांनी सांगितले आहे.

इतका येतो खर्च

हिंदवी यांनी लावलेल्या डाळींबाच्या ६५० झाडांना पाच लाख रुपयापर्यंत वार्षिक खर्च येतो. तर त्याच्यातून पाचपट उत्पन्न निघते. गेल्यावर्षी त्यांच्या डाळिंबीला १२१ रुपये दर मिळाला होता तर यावर्षी त्यांना १३६ रुपये दर मिळाला. यावर्षी त्यांनी एक बाग फेब्रुवारी महिन्यात धरली आहे, तर दुसरी बाग मार्च महिन्यात धरण्याचे नियोजन चालू आहे. तिसरी बाग त्या मे महिन्यात धरत असून, चौथी सीताफळाची बाग त्यांना पुढील वर्षी धरता येणार आहे.