दिव्यांगांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा; घरकुल मिळण्याची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अपंग बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्ना संदर्भात आज शेकडो अपंग बांधवानी राज्यमंत्री बचू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने चंदू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी मनपा आयुक्त यांना प्रतिकात्मक घरकुल ही भेट देण्यात आले.गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिकेने अपंग बांधवांच्या घरकुलाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवाना तात्काळ घरकुल मिळावे अशी मागणी या मोर्चातील नागरिकांनी केली आहे.

दिव्यांगांसाठी घरकुल बांधण्याची घोषणा सुधीर मुनगंटीवाार यांनी १ वर्षांपूर्वी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली होती. त्या अंतर्गत ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकार घर बांधून देणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले होते. दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी या घोषणेचे स्वागत केले होते. मात्र दिव्यांग बांधवाना अजूनही घरकुल मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवानी थेट महानगर पालिकेवर आपला मोर्चा वळवला आहे. या मोर्च्यात अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment