हिंदू महासभेने झाडल्या महात्मा गांधींच्या प्रतिकृतीवर बंदुकीच्या गोळ्या, व्हिडीओ व्हायरल

अलीगड प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७१ वी पुण्यतिथी देशभर साजरी केली जात असताना हिंदू महासभेने गांधीजींच्या प्रतिकृतीवर बंदुकीच्या गोळ्या झाडून नथुराम गोडसे अमर रहे अशा घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे 

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव शकून पांडे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिकृतीवर गोळ्या झाडून गांधीजींची पुण्यतिथी साजरी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अतिशय निर्दयीपणे गोळी मारल्यानंतर गांधीजींच्या प्रतीकृतीमधून रक्तासारखा स्त्राव बाहेर पडताना दिसतो. यावेळी उपस्थित कार्यकर्ते “हिंदू महासभेचा विजय असो, नथुराम गोडसे अमर राहे” अशा घोषणा देताना दिसत आहेत.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून सर्वच स्तरामधून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. देशाचे पंतप्रधान दांडी येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यातीथीनिमित्त जनसमुदायाला संबोधत असतानाच अलीगड येथे असा विद्रूप प्रकार घडल्याने तीव्र निषेध व्यक्त होत आहे. अखिल भारतीय हिंदू महासभा या प्रकरणामुळे वादाच्या भोवर्यात सापडली आहे.

इतर महत्वाचे –

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलिसांनी चिमुकल्याचे जॅकेट उतरवले

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

You might also like