हिंगोली प्रतिनिधी । जिल्ह्यातील कडोळी येथील रमतेराम महाराज विद्यालय मधील शिक्षक शिवाजी घुगरे या शिक्षकाच्या २४ फेब्रुवारी रोजी पाणी बॉटल मध्ये एका अज्ञात इसमाने विष टाकले होते. हे पाणी पिताच शिवाजी घोगरे यांना उलट्या होऊ लागल्यानं त्यांना गोरेगाव येथील सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना वाशीम शहरातील वाशिम क्रिटिकलमध्ये नेण्यात आलं.
दरम्यान, या घडलेल्या घटनेबाबत वाशिम शहर पोलीस स्टेशन यांनी त्यांच जबाब नोंदवला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात घुगरे यांनी कोणीतरी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या पाणी बॉटल मध्ये विष टाकले असावे असे सांगितले. यापूर्वीसुद्धा असा प्रसंग घडल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे पीआय श्रीमनवर, पीएसआय नंदे करीत आहेत. शिवाजी घोगरे यांची प्रकृती सध्या चांगली असून आरोपींना तात्काळ अटक करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.