हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे या ठिकाणी घडली आहे. पार्वती चौरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण चौरे असे आरोपी पतीचे नाव आहे. हि हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मृत पार्वती आणि श्रावण चौरे या दाम्पत्यामध्ये वाद सुरु होता. यानंतर आरोपी पतीने शेतात जात असताना आपल्या पत्नीचा पाठलाग करून तिची कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यानंतर पत्नीच्या नातेवाईकांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली.
काय आहे प्रकरण?
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे गावात घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आहे.
नवरा-बायकोमध्ये घरगुती भांडणं
पार्वती चौरे असे मृत महिलेचे नाव आहे तर श्रावण चौरे असे आरोपी पतीचे नाव आहे. या दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी पत्नी शेतातील आखाड्यावर गेल्याचा फायदा घेऊन आरोपी पतीने कोयत्याने गळा चिरून तिचा खून केला. यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.