मुंबई । बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)
अर्जुन रामपालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याचा अनोखा लूक दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, लांब केस आणि हातातील शस्त्र दिसत आहे. त्यामुळे अर्जुन एखाद्या योद्ध्याप्रमाणे भासत आहे. या पोस्टरला कॅप्शन देताना अर्जुनने Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours, असे कॅप्शन दिले आहे.
“या एका ऐतिहासिक घटनेचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे. यामुळे माझं मन हेलावून गेलं आहे. त्यामुळे तुमचेही मन हेलावून जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे येत्या 2021 ला #TheBattleofBhimaKoregaon सज्ज व्हा,” असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टरला दिले आहे.
Proud to be part of a historical event that blew my mind and is sure to blow yours. #TheBattleofBhimaKoregaon coming in 2021 pic.twitter.com/3rdig3VgSy
— arjun rampal (@rampalarjun) December 10, 2020
काय आहे इतिहास ?
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. त्यावेळी पेशव्यांविरुद्ध लढलेल्या त्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. दरवर्षी या लढाईत महार समाजातील सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released) हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.
फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो. दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं. (The Battle Of Bhima Koregaon Poster Released)
रोहित, माझ्या घरातील व्यक्तींना नका फोडू! 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पंकजांची विनवणी
सविस्तर वाचा-👉https://t.co/sLQVFA7bRn@RRPSpeaks @Pankajamunde @dhananjay_munde @BJP4Maharashtra @NCPspeaks @chalahawayeudya #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; तरुण व्यावसायिकाची 'आय लव्ह यू' लिहून हॉटेल रूममध्ये आत्महत्या
सविस्तर वाचा-👉 https://t.co/ljVnvsw0RT#HelloMaharashtra #sucide— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’