History Of Pizza : पहिला पिझ्झा कुणी बनवला? जाणून घ्या तुमच्या लाडक्या फास्टफूडचा रंजक इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pizza) जगभरातील मूडी फुडी लोकांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणून ‘पिझ्झा’ची एक खास ओळख आहे. शिवाय आजकाल पार्टी ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे बिजनेस पार्टी असो, बर्थडे पार्टी असो किंवा मग बॅचलर पार्टी असो. पिझ्झा शिवाय पार्टी कसली?? गेल्या काही वर्षांमध्ये पिझ्झा हा फेव्हरेट फुड्सच्या यादीत टॉपवर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पिझ्झा हब्स, पिझ्झा पार्लर्स देखील सुरु झाली आहेत.

पिझ्झाचा कलरफुल अंदाज ही त्याची खासियत. त्यामुळे पिझ्झाचे चाहते प्रत्येक वयोगटात आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या लाडक्या पिझ्झाविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत. पहिल्या पिझ्झापासून ते भारतीयांना पिझ्झाची ओळख कशी झाली? इथपर्यंत सगळा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

पहिला पिझ्झा कुणी आणि कुणासाठी बनवला?(History Of Pizza)

सन १८८९ मध्ये नेपल्स, इटलीमध्ये एका पिझ्झेरिया ब्रँडीमधील शेफ रॅफेल एस्पियोसिटो यांनी नेपल्सचा राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा यांच्यासाठी पहिला आधुनिक पिझ्झा तयार केला होता. हा पिझ्झा इटलीच्या ध्वजापासून प्रेरित होऊन तयार करण्यात आला होता. (History Of Pizza) ज्यासाठी त्यांनी लाल टोमॅटो, पांढरा मोझरेला चीज आणि हिरवी तुळस यांचा वापर केला होता. हा पिझ्झा राणीला इतका आवडला कि पुढे जाऊन या ‘आधुनिक पिझ्झा’ला राणीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. अर्थात हा पिझ्झा आज बाजारात ‘मार्गेरिटा पिझ्झा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतीयांना पिझ्झाची ओळख कुणी करून दिली?

नुकताच ९ फेब्रुवारी रोजी जगभरात ‘नॅशनल पिझ्झा डे’ साजरा झाला. आज पिझ्झा हे सगळ्यांचं आवडतं फास्ट फूड आहे. पण हा पिझ्झा भारतातकुठून आला? याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. भारतीयांना पिझ्झा माहित होण्यापूर्वी इटली, ग्रीस, अमेरिका आदी देशांमध्ये पिझ्झा खूप लोकप्रिय होता. पिझ्झाचं वाढतं क्रेझ त्याला भारतापर्यंत घेऊन आलं. आपल्या भारतात १८ जून १९९६ रोजी पहिला पिझ्झा सादर करण्यात आला. हा पिझ्झा संपूर्ण जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली पिझ्झा कंपनी ‘पिझ्झा हट’च्या माध्यमातून सादर केला गेला. पिझ्झा हटमुळे भारतीयांना पिझ्झाची पहिली चव ज्ञात झाली.

आधी डॉमिनोज का पिझ्झा हट?

अनेकांना डॉमिनोजमूळे भारतात पिझ्झा आल्याचे माहित आहे. मात्र खरी गोष्ट अशी कि, डॉमिनोजच्या आधी पिझ्झा हटने भारतातील बंगळुरूमध्ये पहिले पिझ्झा आउटलेट सुरू केले होते. त्यामुळे भारतीयांना पिझ्झाची ओळख करून देण्याचे श्रेय हे ‘पिझ्झा हट’ला जाते. (History Of Pizza) डॉमिनोजने १९९५ मध्ये भारतात फ्रँचायझी घेतली आणि १९९६ मध्ये राजधानी दिल्लीत पहिले पिझ्झा आउटलेट सुरु केले. पुढे जाऊन काही वर्षांनी २००९ साली या कंपनीचे नाव बदलून ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड कंपनी असे ठेवण्यात आले. आज डॉमिनोज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हीच कंपनी डॉमिनोज पिझ्झा भारतात बनवते.

पिझ्झाविषयी काही खास गोष्टी

18व्या शतकात, इटलीतील तिसरे सर्वात मोठे शहर नेपल्समधील गरीब लोक यीस्टचा वापर करून बनवलेल्या सपाट ब्रेडवर टोमॅटो सॉस लावून खायचे. त्या काळात यालाच ‘पिझ्झा’ म्हटले जायचे. मात्र हा पिझ्झा स्टोअरमध्ये नव्हे तर रस्त्यावरील गाड्यांवर विकला जात असे. (History Of Pizza) या पिझ्झाला गरीब लोकांकडून विशेष पसंती होती. पुढे जाऊन या पिझ्झाची चव वाढवण्यासाठी त्यावर टॉपिंग्सचा वापर केला गेला. यामध्ये सिमला मिरची, भोपळी मिरची, मशरूम सारखे पदार्थ वापरले गेले. ज्यामुळे साहजिकच गरीबांमध्ये लोकप्रिय असलेला पिझ्झा महागला.

नवीन बदल केलेला महागडा पिझ्झा इटलीतील स्थलांतरित लोकांनी अमेरिकेत आणला. पुढे १९०५ साली न्यूयॉर्कमध्ये पहिले पिझ्झा पार्लर सुरु करण्यात आले. जिथे हा पिझ्झा विकला जायचा. पिझ्झाचं क्रेझ पाहून १९६० च्या दशकात दोन भवानी होम डिलिव्हरीची शक्कल लढवली. या दोन भावांचे नाव टॉम आणि जेम्स असे होते. (History Of Pizza) त्यांनी मिशिगनमध्ये ‘डोमिनिक्स’ नावाने चालणारी एक छोटी पिझ्झाची फ्रेंचायजी विकत घेतली आणि जलद होम डिलिव्हरीची सेवा सुरू केली. पुढे जाऊन १९६५ मध्ये ‘डोमिनिक्स’चे नाव बदलून ‘डॉमिनोज’ ठेवण्यात आले. आज जगभरात डॉमिनोज हि पिझ्झा विक्री करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.

पिझ्झाच्या कंपनीचा जसजसा विस्तार वाढत गेला तसतसा पिझ्झाही भारतात खप वाढू लागला. पुढे जाऊन १९७० च्या दशकात आपल्या देशातील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा विकला जाऊ लागला. तसेच अनेक पिझ्झा हब्स आणि पिझ्झा पार्लर सुरु करण्यात आले. (History Of Pizza)