एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र ठाकूरांची मागणी  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. पोलीस दलात आपल्या एन्काऊंटर कामगिरीमुळे ते प्रसिद्ध होते. मात्र, आता त्यांच्या या एन्काऊंटर प्रसिद्धीमुळे त्यांच्यावर निवडणूक विरोधकांकडून टीका होत आहे. नालासोपारा मतदारसंघात शर्मा यांच्या विरोधात उभे असलेले बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी शर्मा यांच्या एन्काऊंटर’र्सची चौकशीची मागणी केली आहे. पालघरमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी ही मागणी केली आहे.

शर्मा यांच्यावर सडकून टीका करत ठाकूर म्हणाले की,’प्रदीप शर्मा यांनी केलेले सर्व एन्काऊंटर हे फेक आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या एन्काऊंटरची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहोत.’ दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलात सेवा बजावतांना 117 एन्काऊंटर’र्स केल्याचे बोलले जात आहे.

आज पालघरमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी शर्मा यांच्यावर एन्काऊंटर’र्स चा मुद्द्दा उचलत आरोप केले. सोबतच, पालघर मध्ये विधानसभांच्या जागेवर ‘सेना-भाजपा’ कडून आयात उमेदवारांना संधी दिल्या’ची टीका ही यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली. त्यामुळे ठाकूर यांच्या आरोपाचा शर्मा यांना निवडणूक प्रचारात फटका बसतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्त्वाच्या बातम्या  –