‘मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही’; हितेंद्र ठाकुरांची विलास तारेंवर जहरी टीका

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी । बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. याच निमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाडफाटा येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ठाकूर यांनी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवलेले आमदार विलास तारेंवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले.

“मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाहीये” अशा जहरी शब्दात ठाकूर यांनी तारेंवर टीका केली. ठाकूर यांच्या टिकेनंतर त्यांनी तारेंवरची आपली नाराजी व्यक्त केली.

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांनी या भागात अनेक विकासकामे केली असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच या भागात नागरी समस्या नसल्याचा दावा त्यांनी केला. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here