Holika Dahan 2025| हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण भारतात वेगवेगळ्या परंपरांनुसार साजरा केला जातो. त्यामुळे होलिका दहनच्या तिथी देखील काही ठिकाणी वेगवेगळ्या असतात. हिंदू पंचांगानुसार होलिका दहन कधी करावे, शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घ्या.
यंदा होलिका दहन कधी होणार?
फाल्गुन पौर्णिमा १३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०:३५ वाजता सुरू होईल आणि १४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२:२३ वाजता समाप्त होईल. चंद्राच्या स्थितीनुसार पौर्णिमेचा मुख्य कालावधी १३ मार्चलाच असल्याने यंदा होलिका दहन १३ मार्च रोजीच केले जाईल.(holika dahan 2025) त्यानंतर १४ मार्चला धूलिवंदन साजरा होईल.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त (Holika Dahan 2025)
होलिका दहन करताना योग्य मुहूर्त निवडणे महत्त्वाचे असते. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०:३६ पासून रात्री ११:२९ वाजेपर्यंत भद्रा काळ असेल. भद्रा काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे यंदाचा शुभ मुहूर्त १३ मार्चच्या रात्री ११:३० वाजल्यापासून १:०४ वाजेपर्यंत असेल.
होळीचा सण आणि त्याचे महत्त्व
होळी हा सण(Holika Dahan 2025) भारतात अनेक शतकांपासून साजरा केला जात आहे. यामागे हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद यांची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपाने आपल्या भक्त पुत्र प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेला मदतीला बोलावले, परंतु होलिका स्वतःच अग्नीमध्ये भस्मसात झाली आणि प्रल्हाद वाचला. म्हणूनच हा सण सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. याशिवाय होळी समाजात एकोपा वाढवणारा सण मानला जातो. काही ठिकाणी याला ‘फगवा’, ‘शिमगा’, ‘धुलवड’, ‘डोल पौर्णिमा’ असेही म्हणतात.
होलिका दहन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- शुद्ध आणि पवित्र जागेची निवड: होलिका दहन करण्यासाठी जमिनीवर नैसर्गिकरित्या तयार केलेला चौरस किंवा विटांचे गोल स्थळ निवडावे. सिमेंट किंवा काँक्रीटच्या ठिकाणी होलिका दहन करू नये.
- शेणाच्या गोवऱ्यांचा वापर: धार्मिक मान्यतेनुसार होळीमध्ये शेणाच्या गोवऱ्या जाळल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव मिळतो.
- धान्य आणि गव्हाची आहुती: होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा आणि नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. यामुळे समृद्धी लाभते, असे मानले जाते.
- सुरक्षितता राखा: होळीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जळणाऱ्या वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे आगीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घ्यावी.