हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्व्हल युनिव्हर्सचा ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये गाजत आहे. हॉलिवूडच्या (Hollywood) मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सबाबत चाहत्यांमध्ये एक नेहमीच उत्सुकता असते. यादरम्यानच मार्व्हल सुपरहिरो वर्ल्डशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. वास्तविक, मार्व्हलच्याएका नवीन सिरीजमध्ये आता फरहान अख्तरची एन्ट्री झाली आहे. त्याचे नाव ‘मिस मार्व्हल’ असे आहे.
निर्मात्यांनी फरहानच्या व्यक्तिरेखेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, फरहान अख्तर पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहानचा हा हॉलिवूड डेब्यू असेल. फरहानने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत एक अधिकृत निवेदनही जारी आले आहे. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक असलेला ‘मिस मार्व्हल’ 8 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होईल. Hollywood
फरहान अख्तरबाबत बोलायचे झाले तर तो लवकरच ‘जी ले जरा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार आहे. याशिवाय तो ‘फोन भूत’ सारख्या काही चित्रपटांची निर्मिती देखील करत आहे. Hollywood
हे ही वाचा भूमी पेडणेकरच्या अदांवर चाहते फिदा; पहा फोटो
हे ही वाचा राधिका आपटेच्या पोटाला जखम? व्हिडीओमुळे चाहते हैराण