नवी दिल्ली । आयुष्यभर आपण स्वतःचे घर घेण्यासाठी कष्ट करतो, मात्र फार कमी लोकं आपले हे स्वप्न पूर्ण करू शकतात. वाढत्या महागाईमुळे कोणत्याही भक्कम आधाराशिवाय घर बांधणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत बँका आपल्याला आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी मदत करतात. अनेक बँका वेगवेगळ्या व्याजदरावर होमलोन देत आहेत.
जर तुम्ही देखील नवीन घर घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हालाही होमलोनची गरज भासेल. पगारदार आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना वेगवेगळ्या दराने होम लोन दिले जाते. होम लोन घेण्यापूर्वी आपण निश्चितपणे अनेक बँकांचा अभ्यास केला पाहिजे. कारण होमलोन दीर्घकाळ टिकते. त्यामुळे लोन घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. येथे आम्ही आपल्याला काही बँकांच्या होमलोनच्या व्याजदरांबद्दल सांगत आहोत.
SBI होम लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया- SBI टर्म लोन पगारदार लोकांना 6.80 टक्के ते 7.30 टक्के दराने 30 लाख रुपयांपर्यंतचे होमलोन देत आहे.
HDFC बँक होम लोन
एचडीएफसी बँकेकडून 6.75 टक्के ते 7.15 टक्के व्याजदराने होमलोन दिले जाते. महिलांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनचा दर 6.75 ते 7.25 टक्क्यांपर्यंत आहे. 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचे 7.05 ते 7.55 टक्के दराने लोन दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा होम लोन
बँक ऑफ बडोदा नोकरदारांना 6.50 टक्के ते 7.85 टक्के दराने होम लोन घेत आहे. त्याच वेळी, ते स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना 6.50 टक्के ते 7.85 टक्के दराने होम लोन देत आहे.
कोटक महिंद्रा बँक होम लोन
एका खास ऑफर अंतर्गत, कोटक महिंद्रा बँक 10 डिसेंबरपर्यंत होम लोन घेणार्यांना 6.55 टक्के प्रारंभिक व्याजदराने होम लोन देत आहे. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना 6.6 टक्के व्याजदराने लोन देत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या वतीने नोकरदारांना 6.55 टक्के ते 7.10 टक्के दराने होम लोन दिले जात आहे. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना 6.65 टक्के ते 7.25 टक्के दराने होम लोन दिले जात आहे.
ICICI बँकेचे होम लोन
ICICI बँक पगारदार लोकांना 6.70 टक्के ते 7.40 टक्के व्याजाने होम लोन देत आहे. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना 6.90 टक्के ते 7.55 टक्के होम लोन दिले जात आहे.