Home Loan| आता स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ बँका देतात कमी व्याजदराने गृहकर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Home Loan प्रत्येकजण आयुष्यात काही ना काही स्वप्न पाहत असतो. आणि त्या स्वप्नांच्या यादीतील एक सगळ्यात मोठे स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःचा हक्काचं असं घर. आणि हे घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु आजकाल घराच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांना एक रकमी स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून गृह कर्ज घेत असतात.

आजकाल बँकेच्या माध्यमातून होम लोनची (Home Loan) प्रक्रिया देखील अगदी सहज आणि सोपी झालेली आहे. त्यामुळे अनेक लोक होमलोन घेऊन स्वतःचे घर घेताना दिसत असतात. परंतु हे होम लोन दीर्घकाळासाठी असल्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर किंवा नियोजनावर या कर्जाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आजकाल होम लोन घेताना कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल हे पाहणे देखील गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल. आता या लेखांमध्ये आपण अशा बँकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्या अगदी कमी व्याजदरामध्ये होम लोन उपलब्ध करून देतात.

एचडीएफसी बँक (Home Loan)

एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज पुरवठा करते. ही बँक होम लोनवर वर्षाला 9.4 ते 9.95% एवढा व्याजदर आकारते.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना होम लोनची सुविधा देखील पुरवत असते. परंतु होमलोन देताना या होम लोनचा व्याजदर हा समोरच्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असतो. साधारणपणे ही बँक 9.15 ते 9.75 टक्के पर्यंत होम लोन वर व्याजदर आकारते.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळे कर्ज देत असतात. ही बँक होम लोन देखील देते. होम लोनवर ही बँक त्यांच्या ग्राहकांना 9.40 ते 10.5% पर्यंत व्याजदर देते.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक ही त्यांच्या ग्राहकांना नेहमीच होम लोनची सेवा प्रदान करत असते. ही बँक त्यांच्या ग्राहकांना 8.7 टक्के दराने कर्ज देत असते, पण अर्जदार व्यवसायिक असेल तर त्याला 8.75 टक्के नाही व्याजदर मिळते.

पंजाब नॅशनल बँक | Home Loan

पंजाब नॅशनल बँक कर्ज देत असताना ग्राहकांच्या सिबिल स्कोर चेक करत असते. त्यामुळे तुमच्या कर्जाची एकूण रक्कम आणि परतफेडीच्या कालावधीवर हा व्याजदर अवलंबून असतो. ही बँक ग्राहकांना 9.4 ते 11.6% या दराने व्याजदर आकारते.