औरंगाबाद – ओमिक्रॉन हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत.
त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच प्रत्येक खासगी रुग्णालयात RTPCR चाचणीची सोय करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
काय आहेत जिल्ह्याधिकाऱ्यांचे नवे आदेश ?
– शहरातील चौका-चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
– खासगी रुग्णालयात ओपीडीबरोबरच RTPCR तपासणी सक्तीची करावी
– कोव्हिड पॉझिटिव्ह अहवाल आल्यास अशा नागरिकांचे घरीच विलगीकरण करणे बंद करावे. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
– लसीकरणाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवावे.
– विना मास्क वाहनधारक दिसल्यास संबंधित गाडीचा फोटो परिवहन विभागाकडे पाठवला जाील.
– अशा वाहनधारकाला परिवहन विभागामार्फत नोटीस दिली जाईल.